दुष्काळग्रस्त भागातील माळरान फुललंय बहुपिकानं

राज्य दुष्काळानं होरपळतंय. दुष्काळग्रस्तांना चारापाणी देण्याचं काम सरकार करतंय, तरीही दुष्काळग्रस्तांच्या हलाखीत दिवसेंदिवस भरच पडतेय. ही वस्तुस्थिती एका बाजूला असताना दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यातील शिवणे येथील सुरेश रामहरी गायकवाड हे मजेत शेती करण्यात गुंग आहेत. माळरानाच्या ओसाड जमिनीवर त्यांनी द्राक्ष, कलिंगड, खरबूज, झेंडू, केळी आणि उसाचंही पीकही घेतलंय. तुम्ही म्हणालं हे कसं काय बाबा? अहो, सुमारे 3000 कोटी लिटर साठवणूक क्षमता असणारं शेततळं त्यानं साकारल्यानं ही जादू घडलीय. या पाण्याचा काळजीपूर्वक वापर करून तो बहुपीक पद्दत राबवतो. हे शेततळं म्हणजे त्याच्यासाठी ओअॅसिसच ठरलंय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.