दौलताबादनं राखलीय 'दौलत पाण्याची'!

मराठवाड्यात आता दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्यात. गावविहिरी कोरड्याठाक पडल्यानं अनेक गावातील महिलांना पाण्यासाठी जीवघेणी भटकंती करावी लागतेय. परंतु, जगप्रसिद्ध दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या दौलताबाद गावातील गावकरी पुरेसं पाणी मिळत असल्यानं आनंदी आहेत. ही किमया साधलीय जलपुनर्भरणामुळं ! गावविहीर आटल्यानंतर केवळ टँकरची मागणी करून त्याच्याकडं डोळं लावून हे गावकरी बसले नाहीत. त्यांनी शक्कल लढवली. मिळून साऱ्यांनी काम केलं. त्याचं फळ म्हणजे टॅंकर बंद होऊन त्यांना दारात नळानं पुरेसं पाणी येतंय. गावकरी आणि पंचायत यांनी एकीनं काम केलं तरं गावपातळीवरच पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, हे यातून स्पष्ट झालंय.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.