दादा मडकईकर, कवीमुश्ताक खान पौर्णिमेचं चांदणं पडलंय. त्या चांदण्याच्या प्रकाशात सुरूचं बन चमकून उठलंय. चिऱ्याच्या बांधावर बसलेली विरहिणी त्या लख्ख चांदण्यात न्हाऊन जात असताना येणारा समुद्रावरचा गार वारा तिच्या अंगाला झोंबतोय. रेतीतल्या माडांच्या झावळ्यांच्या आडोशानं चंद्र लपाछपी खेळतोय. अशा वातावरणात सजणाच्या आठवणीनं ती मोहरून गेलीय. हे चित्र दादा मडकईकर यांनी आपल्या या कवितेतून रेखाटलंय. 'पूनयेच्या राती गो, चांन्याच्यो वाती गो...' पूनयेच्या राती गो, चांन्याच्यो वाती गो Tags |
||
Comments
|