दादा मडकईकर, कवी

मुश्ताक खान

मिरगाचो पाऊस इलो, मातीयेचो वास इलो...
या कवितेत नुकतंच लग्न झालेल्या विवाहितेची व्यथा मांडण्यात आलीय. लग्नानंतर नवरा कामानिमित्त मुंबईला गेलाय. एकांतात तिला त्याची खूप आठवण येतेय. नवऱ्याला लवकर बोलवण्यासाठी रवळनाथाला तिनं नवसही केलाय. दिवस कसाबसा जातोय, पण रात्र खायला उठते. मिरगाचा (मृग नक्षत्राचा) पाऊस सुरू झालाय, सर्वत्र मातीचा सुगंध दरवळतोय. इतक्या रम्य वातावरणात आलेल्या एकटेपणामुळं ती नवऱ्याच्या प्रेमाकरता आसुसलीय. नवविवाहितेची भावना दादा मडकईकर यांनी आपल्या कवितेतून अचूक टिपलीय.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.