दादा मडकईकर, कवी

मुश्ताक खान

तारीया मामा, तारीया मामा होडी हाड रे...
आईला आपल्या तान्ह्या बाळाची काळजी लागलीय. सायंकाळ झालीय. तिची गाडी चुकल्यामुळं नदीपल्याड असलेल्या आपल्या घरी लवकर जाण्याच्या ओढीनं ही माऊली नाविकाला नौका लवकर वल्हवायला आर्जवं करतेय. माझं बाळ रडून रडून झोपी गेलं असेल का? माझी म्हातारी आजारी आहे, त्यामुळं माझ्या बाळाला कोण जोजवणार, या चिंतेनं तिला भेडसावलंय. म्हणून ती तारीयामामाला लवकर चलण्यास विनंती करतेय. आईच्या ओथंबलेल्या मायेच्या ओलावा दादा मडकईकर यांनी आपल्या कवितेतून अचूक टिपलाय.

तारया मामा, तारया मामा, होडी हाड रे
बेगीन पोचय माका पैलाडी रे
पाळण्यात माझो झील निजलो हा
बापूस तेचो कट्यार गेलो हा
घरात म्हातारी शिक असा रे...
तारी- भिया नको चेडवा मिया इलंय इलंय
इतकी रात तिया खेका केलंय
म्हातारेक वशेद हाडूक कुडाळाक गेल्लंय
येता येता वायच बाजार केलंय
चाराची गाडी माका चुकली मरे
बेगीन पोचय माका पैलाडी रे
हेच्याफुडे जावन रांदूक होया
झिलाक दूद दियूक होया
रडान रडान तो निजतलो रे
बेगीन पोचव माका पैलाडी रे

 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.