राज ठाकरे, अध्यक्ष,मनसे

सोलापूर इथं झालेल्या राज ठाकरेंच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्यांनी ठाकरी भाषेत समाचार घेतला. रोज सकाळी लवकर उठतो, असं अजित पवार म्हणतात. लवकर उठून काय...सतत पैशांचे व्यवहार करायचे, मग झोप कशी लागणार? `काका मला माफ करा` असं म्हणणाऱ्या अजित पवारांच्या पाठीशी एकही आमदार नाही. राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणं पोलिसाबद्दल दया दाखवली. गृहमंत्री आर. आर. पाटलांची पोल खोल केली. असा गृहमंत्री असतो? तिकडे नितीशकुमार यांनी गुन्हेगारांना जेरबंद करून बिहारवासीयांना विश्वास मिळवून दिलाय, इकडं महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी बिहार केलाय. आपले केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उजनीचं पाणी बारामतीला नेऊन कोणतं राजकारण करीत आहेत. लवासा सुंदर होऊ शकतं, मग सोलापूर का नाही.. असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.