दुष्काळी सांगोलाला शेततळ्यांचं वरदानआजूबाजूला ओसाड माळरान, पाण्याची कमतरता... पण अशाच ओसाड माळरानावर नंदनवन फुलवण्याचा संकल्प घेतलाय, महूदच्या किशोर पटेल यांनी. केळी, ऊस, आणि इतर फळबागांनी हे क्षेत्र फुलावं यासाठी त्यांनी दोन शेततळी उभारुन पाण्याचं नियोजन केलंय. आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी 'जिथं शेत, तिथं तळं' या योजनेचा लाभ घेत आधुनिक तंत्रज्ञाची कास धरलीय. सोलापूरच्या दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यात येणाऱ्या महूद गावातली ही शेततळी इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहेत. Tags |
||
Comments
|