गोपीनाथ मुंडे - रेल्वे बजेट

देशाचं लक्ष लागून राहिलेला रेल्वेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लोकसभेत महाराष्ट्राची 'दुष्काळ एक्सप्रेस' दाखल झाली. भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी दुष्काळाचा प्रश्न मांडून देशाचं लक्ष या प्रश्नाकडं वेधून घेतलं. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता अत्यंत तुटपुंजी रक्कम केंद्र सरकारनं दिलीय. तेव्हा राज्य सरकारनं मागणी केल्याप्रमाणं पाच हजार कोटींची मदत द्या, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची कर्जं, तसंच शेतीपंपासह घरगुती वापराच्या विजेची बिलं माफ करा आणि मुलांच्या कॉलेजची फी माफ करा, अशा मागण्या त्यांनी केल्या. दुष्काळाचं गांभीर्य केंद्राबरोबरच राज्य सरकारलाही नाही, असा आरोप करून दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंदाचं पथक येणार होतं, त्याचं काय झालं, असा सवालही मुंडे यांनी केला.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.