दादांची 'विच्छा' पुन्हा रंगभूमीवर - भाग 2सुखदा खांडगे ठाणे - शाहीर दादा कोंडके यांचं विच्छा माझी पुरी करा' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरलंय. वसंत सबनीसांनी जो 'छपरी पलंगाचा वग' लिहिला होता, त्याचीच रंगावृत्ती म्हणजे 'विच्छा माझी पुरी करा'. दादांनी आपल्या हजरजबाबी, तल्लख आणि धारदार शब्दफेकीतून या वगाची रंगत उत्तरोत्तर वाढवत ठेवली. तीच लज्जत आताही चाखायला मिळतेय.
मनोरंजनातून सामाजिक भान प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित हे नाटक पुन्हा एकदा रसिकांसाठी 'सुयोग' या नाट्यसंस्थेनं आणलंय. दादांनंतर मालवणी रंगभूमीवरील विनोदी अभिनेते दिगंबर नाईक यांच्यासह गणेश मयेकर, मनोज टाकणे, सुनील अष्टेकर,, संजय मोहिते आणि नवतारका धनश्री दळवी असे कलाकार यात आहेत. सद्य स्थितीतील विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणारं हे लोकनाट्य मुळात रचलं होतं ते लोकांच्या मनातील आक्रोश बाहेर आणण्यासाठी. दादांसारखा जातिवंत कलाकार समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर नजर ठेवून असायचा आणि मग या सामाजिक प्रश्नांना आपल्या अंगभूत विनोदी शैलीत आणि मर्मभेदक टोमण्यांतून वाचा फोडायचा. हा कोंडके बाज हरवणार नाही, याची काळजी दिग्दर्शकानं घेतलीय.
दादा कोंडकेंची 'विच्छा...'तील कोतवालाची भूमिका निभावण्याचं शिवधनुष्य मालवणी कलाकार दिगंबर नाईक यांनी उचललंय. या नाटकाविषयी सांगताना दिगंबर म्हणतो की, सहकुटुंब बघावं असं हे नाटक आहे आणि म्हणूनच यात द्वयअर्थी शब्दांचा वापर कटाक्षानं टाळलाय. नव्या पिढीनं समाजातील विविध विषयांना उजाळा देत आणि हे विषय हळुवार हाताळत हे वगनाटय विनोदासह शृंगारानंही परिपूर्ण नटवलंय. विच्छा...च्याच धर्तीवर उषा बॅनर्जी यांनी हिंदीत हे नाटक 'सैंया भाये कोतवाल' या नावानं रंगभूमीवर आणलंय. समाजातील समस्यांवर भाष्य करण्याची ताकद लोककलांमध्ये आहे. त्यात तमाशा आघाडीवर आहे. हे तमाशाप्रधान नाटक पाहताना हेच जाणवतं. Tags |
||
Comments
|