'वाईन पर्यटनाचा विकास करणार'

नाशिक - राज्यात इतर पर्यटनाप्रमाणं वाईन पर्यटनाचा विकास होण्याची गरज आहे, त्यामुळं वाईन पर्यटनाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असं आश्वासन राज्याचे पर्यटनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलंय. नाशकात दोन दिवसीय वाईन फेस्टिव्हलचं उद्घाटन छगन भुजबळ यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. परदेशामध्ये वाईन फेस्टिव्हल मोठ्या प्रमाणात फोफावला असून, त्या तुलनेत वाईनकडं पाहण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा आहे. हा दृष्टिकोन बदलायला हवा, असंही ते म्हणाले.   

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.