वाईनची मज्जा आता 'पाऊच'मध्ये!

नाशिक - आपली शेती आणि शेतीपूरक उद्योग बदलत्या काळाशी जुळवून घेत नाहीत, मार्केटमधल्या ट्रेंड्सची माहिती ठेवत नाही, हा समज खोटा पडेल असा उपक्रम, राज्यातल्या वाईन उत्पादकांनी सुरू केलाय. त्यांनी वाईन आता चक्क छोट्या पाऊचमध्ये उपलब्ध करून दिलीय. त्यामुळं शॅम्पू, तेल, शीतपेयं आदींच्या सोबतच वाईनही पाऊचमध्ये परवडणाऱ्या किमतीत मिळताना दिसेल. यातून वाईनचा प्रसार तर झपाट्याने होईलच, शिवाय द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही चांगला फायदा होईल. नाशिकमध्ये पार पडलेल्या वाईन फेस्टिव्हलमध्ये पुण्याच्या पॉज वाईन्सनं वाईन पाऊचमध्ये सादर केली. या 'पाऊच वाईन'ला उत्तम प्रतिसादही मिळू लागलाय. राज्यातला हा पहिलाच उपक्रम आहे. यंदा झालेल्या या वाईन फेस्टिवलचा 'भारत4इंडिया' मीडिया पार्टनर होता.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.