अत्यल्प पाण्यात पिकली सेंद्रीय द्राक्ष

नाशिक - द्राक्ष म्हटलं की, बागायती पीक असाच आपला समज आहे. परंतु सर्वाधिक द्राक्ष पिकणाऱ्या युरोप खंडात पाण्याशिवाय भरघोस प्रमाणात द्राक्ष घेतली जातात. युरोपातील पाण्याशिवाय द्राक्ष पिकवण्याची ही ट्रिक समजून घेऊन नाशिक जवळच्या लासलगावच्या (ता. निफाड) किशोर होळकर या प्रगतशील शेतकऱ्यानं मोठ्या हिकमतीनं माळरानावर द्राक्ष पिकवली. अत्यल्प पाण्यात सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेल्या या द्राक्षांची गुणवत्ता जिभेला लगेच जाणवते. मग गुणवत्ता असल्यावर दराला काय तोटा? बाजारपेठेत इतरांपेक्षा त्यांच्या द्राक्षांना जादा भाव मिळतोय. चव हेच आमचं मार्केटिंग, असं ते छातीठोकपणं सांगतात. एवढी त्यांना द्राक्षांच्या गुणवत्तेबद्दल खात्री आहे. आता बोला...!  

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.