रयत विज्ञान प्रदर्शन, सातारा

कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेत नुकतंच एक आगळंवेगळं विज्ञान प्रदर्शन पार पडलं. यावेळी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांनी अणुभट्टीपासून सॅटेलाइट, रॉकेटपर्यंतची मॉडेल्स सादर केली. कोणीही थक्क व्हावं, असं हे 'रुरल टॅलंट' (ग्रामीण शहाणपण) होतं. हे पाहिल्यानंतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनीही विद्यार्थ्यांची पाठ थोपवली. मुंबईच्या भाभा विज्ञान मूलभूत शिक्षण सहकार्यानं पार पडलेल्या या विज्ञान जत्रेची 'चला जाणून घेऊया ज्ञानरचनावाद' ही मध्यवर्ती कल्पना होती. राज्यात अशा पद्धतीचं हे पहिलंच विज्ञान प्रदर्शन होतं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यावेळी विज्ञानावर आधारित ३०० विविध प्रयोगांचं सादरीकरण केलं. या उपक्रमात माध्यमिक शाळांचे सुमारे एक हजार शिक्षक आणि एक हजार विदयार्थी सहभागी झाले होते.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.