आमने - सामने, भाग - 1

ब्युरो रिपोर्ट

बुलडाणा - बृहन्महाराष्ट्र ज्योतिष महामंडळाचे राज्याध्यक्ष नंदकिशोर जकातदार आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव यांच्यामध्ये एका कार्यक्रमात ज्योतिषशास्त्र विरुद्ध अंधश्रद्धा असा सामना रंगला. स्थानिक पत्रकारांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये रंगलेल्या जुगलबंदीनं दोन विरोधी मतप्रवाहांना, विचारांना एकाच व्यासपीठावर ऐकण्याची संधी खामगावच्या जनतेला मिळाली. पाहूयात त्यातल्या ज्योतिषशास्त्राला विद्यापीठात मान्यता हवी का? याबद्दल दोन्ही वक्त्यांनी मांडलेली मतं.

   

Comments (1)

  • खरे तर खामगाव च्या पत्रकार बांधवानी अतिशय सुरेख असा हा कार्यक्रम आयोजित केला होता. शाम मानव या कार्यक्रमात उत्कृष्ट वक्ते असल्याने त्यांनी अतिशय सुंदर आणि मुद्देसूद रित्या त्यांचे म्हणणे मांडले मात्र त्यांचे विचार हे माधव रिसबूड यांच्या पुस्तकात १९९७ पूर्वीच नमूद करण्यात आलेले असल्याने ज्यांनी रिसबूड यांचे पुस्तक वाचले असेल त्यांना या भाषणात नवीन मुद्दे आहेत असे काही वाटले नाही, तसेच शाम मानव यांनी फलजोतीष्य शास्त्र नाही अशी मांडणी केली मात्र ते शास्त्र कसे नाही याची सिद्धता त्यांचे प्रतिस्पर्ध्याचे अभ्यासावर आधारित होती. फलजोतीष्य शास्त्र नाही याची शास्त्रीय सिद्धता शाम मानव यांना करता आली नाही. त्यांची मांडणी केवळ शब्दछल होता . तर ते शास्त्र आहे हे जकातदार यांना सिद्ध करता आले नाही. त्यांना शब्दछल ही करता आला नाही. त्यामुळे दोघांचेही भाषण छान झाले तरी नेमका मुद्दा स्पष्ट झाला नाही.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.