दासनवमी सोहळा, सज्जनगड

सज्जनगडावर 'जय राम श्रीराम जय जय राम'च्या जयघोषात दासनवमी सोहळा नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. सज्जनगडावरील समर्थ रामदास स्वामींच्या समाधीला वंदन करण्यासाठी राज्यभरातून भाविक सहभागी झाले होते. समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे राजगुरू होते. समर्थ रामदास स्वामींचं सज्जनगड हे निवासस्थान. छत्रपती शिवरायांनी रामदास स्वामींना भेट दिलेला पलंग, रामदास स्वामींची वल्कलं, त्यांचे शिष्य कल्याणस्वामी पाणी आणत त्या हंडा-कळशी आदी वस्तूंचं इथं संग्रहालय आहे. त्याचा साताऱ्याच्या योगेश हिरवे यांनी पाठवलेला व्हिडिओ.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.