दुष्काळातही हिरवंगार 'कडवंची'

दुष्काळामुळं संपूर्ण महाराष्ट्राचा गळा पाणी पाणी करतोय. पाणीटंचाईनं परिसीमाच गाठल्यामुळं गावागावांत टॅंकरच्या संख्येत तिपटीनं वाढ करण्यात आलीय. अशा या दुष्काळाची सर्वात जास्त झळ जर कोणाला बसली असेल तर ती गरीब बळीराजाला. आई जेवण देईना आणि बाप भीक मागू देईना, अशी त्यांची अवस्था झालीय. जिथं माणसांचे असे हाल तिथं पिकांच्या, जनावरांच्या हालांना पारावारच नाही. पण अशातही जालना जिल्ह्यातल्या कडवंची गावानं पाण्याचा योग्य ताळेबंद मांडून, पिकांचं व्यवस्थापन करून आणि पाणी वापराचं काटेकोर नियंत्रण करून सर्वांपुढं दुष्काळाच्या भस्मासुरालाही योग्य नियोजनानं यशस्वी तोंड देता येतं हे आपल्या आदर्शानं दाखवून दिलंय. 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.