मन लाटांमध्ये चिंब...मुश्ताक खान सिंधुदुर्ग - आपल्या कवितेच्या माध्यमातून मनाचे विविध कप्पे दादा मडकईकर यांनी उलगडून दाखवले. त्यांना साथ दिली तबलावादक किशोर सावंत यांनी. मन लाटांमध्ये चिंब मन बुडणारे बिंब मन बगळ्यांचा थवा मन गारगार हवा मन गर्द हिरवे रान मन बासरीची धून मन खळाळते पाणी मन पाखरांची गाणी मन पाण्यावर नाव मन आजोळचा गाव मन लाल पायवाट मन नदीचा काठ मन अवसेची रात मन कंदिलाची वात मन पिंपाळाचा पार मन झाले देवचार मन तेवणारी ज्योत मन जुळणारे हात मन भजनात दंग मन तुक्याचे अभंग
Tags |
||
Comments
|