पळस फुललो रानात...

मुश्ताक खान

'पळस फुललो रानात, पळस फुललो मनात' या कवितेतून कवीला लागलेली वसंताच्या आगमनाची चाहूल प्रत्येक ओळीतून जाणवत राहते... आणि आपल्या डोळ्यासमोर तो फुललेला कोकणातला वसंत साक्षात उभा राहतो. मालवणी कवी दादा मडकईकर यांनी आपल्या मधुर आणि तरल मालवणी कवितेतून या निसर्गाचं मनोरम्य दृश्य उभं केलंय.

 

पळस फुललो रानात, पळस फुललो मनात
फांदीये फांदीयेर सावर फुलली, सगळ्या रानात उक्क्षी फुलली
नागचाफ्याची फुला दडली, हिरव्या हिरव्या पानात
आबोली फुलली, ओवळा फुलली, ढवळी पिवळी, शेवती फुलली
हरतरेची फुला फुलली होळीयेचा सणात...
फुला फुलार पाखरा नाचली
मद पिवन किलबिलाटली
मदमाश्यांनी पोळा बांधला
घराच्या गे कोनात
पळस फुललो रानात, पळस फुललो मनात

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.