माहेरचं निमंत्रण

स्त्रीच्या आयुष्यात बदल घडवणारी एक घटना म्हणजे लग्न... जिथं आपण खेळलो, बागडलो, लाडाकोडात वाढलो, हट्ट पुरवून घेतले, त्या आपल्या मायेच्या पखरणीला लग्नानंतर दुरावणं... सासरी जाण्याच्या आनंदाबरोबरच आप्तांपासून विलग होण्याच्या दुःखाची किनार असलेला हा प्रसंग. पण या माहेरवाशिणींना लग्नानंतर तुमचं हक्काचं घर तुमची वाट बघतंय, तुमची भेट घेण्यासाठी आसुसलंय, अशा आशयाची निमंत्रण पत्रिका वाशीम जिल्ह्यातल्या अरख गावच्या ग्रामस्थांकडून या माहेरवाशिणींना पाठवली जाते. दरवर्षी महाशिवरात्रीला गावात भरणाऱ्या जगदीश्वराच्या जत्रेत येण्यासाठी हे निमंत्रण पाठवण्यात येतं आणि या दिवशी त्या लेकींची सन्मानानं साडीचोळी देऊन बोळवण करण्यात येतं.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.