प्रदीप पुरंदरे, ज्येष्ठ जलतज्ज्ञ : भाग – 1

घोटी, नाशिक - ज्येष्ठ जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी 'भारत4इंडिया'च्या 'जागर पाण्याचा' या अभिनव उपक्रमाचं कौतुक केलं. 'जागर पाण्याचा' या उपक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या कडवंची गावकऱ्यांच्या यशोगाथेचा दाखला देत पाणी वाचवण्यासाठी जागरूक राहण्याचं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं. जालना जिल्ह्यात भीषण दुष्काळ असताना कडवंची पाणी राखू शकतं. शेत पिकवू शकतं तर मग आपण का नाही, असा अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न विचारून मनात आणलं तर हे सर्व आपण करू शकतो, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला. शिवाय पाण्याच्या बाबतीत सरकार योजना राबवतंयच, पण 'मायबाप सरकार', म्हणजेच सर्व काही सरकार करेल, या मानसिकतेतून आपण बाहेर यायला पाहिजे. पाण्याच्या प्रश्नी एनजीओ आणि सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या संस्था, संघटना यांनी पुढाकार घेतला पाहिजे. या सर्वांच्या सहकार्यातून आपणाला नक्कीच दुष्काळावर मात करता येईल, असाही विश्वास पुरंदरे यांनी बोलून दाखवला.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.