जनावरांच्या संवर्धनासाठी स्पर्धा

अपर्णा देशपांडे

घोटी, नाशिक - आपल्या देशात 29 प्रकारच्या जातीची जनावरं आढळत असून महाराष्ट्रात पाच जातींचे बैल आढळतात. डांगी, खिल्लार, देवनी, लालकंधारी आणि गावलाओ या पाच प्रकारचे बैलांच्या जाती राज्यात आहेत. त्यातले डांगी बैल हे भात शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत. डांगी पावसाळ्यात तग धरतात, त्यामुळं भाताच्या शेतीसाठी ते उपयुक्त ठरतात. अशा या बहुपयोगी जनावरांच्या मूळ जातींचं संगोपन करण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा घेणं आवश्यक असल्याचं मत इगतपुरी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. शांताराम भोईर यांनी व्यक्त केलंय. त्यांच्यासोबत बातचीत केलीय आमची रिपोर्टर अपर्णा देशपांडे हिनं...

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.