'डांगी'वर उमटणार भारताची मोहोर

आपल्या कृषिप्रधान देशातील पशुधनाचं संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी सरकार पुढाकार घेत असतं. त्यात महाराष्ट्र सरकार नेहमीच आघाडीवर राहिलंय. 'भारत4इंडिया'नं घेतलेल्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेतून जे संचित हाती लागलंय ते सरकारी योजनांसाठी बळकटी देणारंच ठरणार आहे. घोटीला (जि. नाशिक) झालेल्या स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या 'टॉप ब्रीड'च्या रक्ताचे नमुने तपासून, त्यांचा जनुकीय अभ्यास केला जाणार आहे. त्यातूनच या डांगी आणि खिल्लार जातींच्या बैलांचं जतन आणि विकास करण्यासाठी भविष्यात सरकार विविध योजना राबवणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर याबाबतचा अहवाल सादर करून 'डांगी'सारखी दुर्मिळ जात जगात केवळ नगर आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागातच आढळते, यावर शिक्कामोर्तब होईल.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.