कोकणात पेटू लागला वणव्याचा नारा!

विकासाच्या नावाखाली नष्ट केली जाणारी वनराई, नियोजित नवनवीन प्रकल्पांसाठी हिसकावल्या जाणाऱ्या जमिनी यामुळं कोकणातील अल्पभूधारक गरीब शेतकरी अगोदरच पिचलेला आहे. त्यात आता भर पडलीय वणव्यांची. वणव्यांमुळं आंबा, काजू आणि सागाच्या हजारो हेक्टर बागा खाक झाल्यात. सरकार दरबारी मात्र वणवे निसर्गनिर्मित असल्याचं कारण पुढं करून नुकसानभरपाई दिली जात नाही. वणवे लागतायत, बागा खाक होतायत, भरपाई काही मिळत नाही... अशा कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा आता संयम सुटत चालला असून, वणव्यांमुळं नुकसान होणाऱ्या फळबागांना भरपाई द्या, असा नारा इथं घुमू लागलाय.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.