वासराच्या संगोपनातून कमाई

विवेक राजूरकर

घोटी, नाशिक -  'भारत4इंडिया'तर्फे घोटी इथं आयोजित केलेल्या खिल्लार आणि डांगी या जातिवंत जनावरांच्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेनिमित्त जनावरांचा बाजारही भरला होता. त्यासाठी राज्यातल्या विविध  भागांमधून शेतकरी आपापली जित्राबं घेऊन आले होते. यामध्ये मोठ्या जनावराप्रमाणंच लहान वासरंही खरेदी-विक्रीसाठी या बाजारात आली होती. इथं आलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या संसाराचा गाडा या वासरांच्या संगोपनातून पुढं झालेल्या कमाईतूनच चालतो. या भरलेल्या जनावरांच्या बाजारातून वासरू विकत घ्यायचं त्या वासराचं दोन-तीन वर्ष चांगलं संगोपन करायचं आणि मग बाजारात विकायचं. पुन्हा वासरू घ्यायचं, असा का क्रम कायम सुरू असतो. वासराचं संगोपन करत असताना त्या दोन-तीन वर्षांत त्याचा उपयोग शेती आणि इतर कामांसाठी करून घेतला जातो. असंच वासराच्या संगोपनातून कमाई करणारं रतनवाडीहून आलेलं बांडकुळे कुटुंब. त्यांच्यासोबत खास बातचीत केलीय आमचे ब्युरो चीफ विवेक राजूरकर यांनी.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.