पाडव्याच्या सणाला राजा फळांचा आला!

हिंदू नववर्षाची सुरवात गुढीपाडव्याला होते. मऱ्हाटी मुलुखात अगदी आदिवासी पाड्यापासून ते कोल्हापुरातल्या पंचगंगेकाठच्या बागायतदार शेतकऱ्याच्या घराम्होरं उंच, उंच गुढी उभी रहाते. नवं वस्त्र, कडूनिंबाची डहाळी आणि साखरेची माळ घालून दारची गुढी सजते. मग तिची पूजाअर्चा न् नैवद्य...नैवद्याच्या ताटात लहानथोरांच्या तोंडाला हमखास पाणी सोडणारी वस्तू म्हणजे फळांचा राजा अर्थात पिवळाधम्मक आंबा. पाडव्याच्या महूर्तावर हा आम्रराज प्रत्येक घरात असा अगदी रुबाबात प्रवेश करतो. आंब्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेलं नवी मुंबईतलं एपीएमसी मार्केट सध्या आंब्याच्या आगमनानं गजबजून गेलंय. 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.