गोंदियाची कलिंगडं चालली फॉरीनला

उन्हाळ्याच्या काहिलीत तहान भागवायची म्हटलं तर मस्त थंडगार लालचुटूक कलिंगड खाण्याची मजा काही औरच असते. याच कलिंगडांनी केवळ तहान न भागवता सडक अर्जुनी तालुक्यातील चिचटोला गावातील टिकाराम गहाणे या प्रयोगशील शेतकऱ्याला धनवानही बनवलंय.  त्यांची ही कलिंगडाची शेती फळाला येऊन भरघोस उत्पन्नही देऊ लागलीय. त्यांचा आदर्श घेत तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनीही २५० हेक्टरवर कलिंगडाची लागवड केलीय. राज्यभरातून या कलिंगडांना चांगली मागणी तर आहेच, याशिवाय गोंदियाची ही कलिंगडं आता परदेशाचीही तहान भागवण्यास रवाना झाली आहेत.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.