आंबा, काजूच्या बागेत बहरली पपई!

कोकण म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतात त्या आंबा, काजू, फणस, पोफळीच्या बागा. पण आता कोकणातला शेतकरीही आधुनिक शेतीकडं वळू लागलाय. पारंपरिक शेतीमध्ये विविध आंतरपीक घेऊन उत्पादन वाढवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असलेली पाहायला मिळते. गुहागरच्या गजानन पवार यांनी आंबा, काजू , माड यांच्यात आंतरपीक म्हणून चक्क पपईची लागवड केलीय. आपल्या चार एकर शेतीत पपईचं आंतरपीक घेण्याचा प्रयोग यशस्वी करून त्यांनी चांगला नफाही कमावलाय. ही त्यांची यशोगाथा पाहण्यासाठी अवघ्या कोकणातून शेतकरी येतात आणि आपणही असा प्रयोग करून बघू, असा संकल्प करूनच इथून निघतात. त्यामुळं नजीकच्या काळात कोकणात पपईचं भरघोस उत्पादन होण्याचीच ही नांदी म्हणावी लागेल.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.