पाठीवर बिऱ्हाड, जत्रांमध्ये दुकान

विवेक राजूरकर

नाशिक जिल्ह्यातील घोटीजवळच्या खंबाळे गावात 'भारत4इंडिया'तर्फे 'टॉप ब्रीड' ही कामधेनूंच्या लेकरांची अभिनव स्पर्धा पार पडली. इगतपुरीच्या पंचक्रोशीत आढळणारी डांगी आणि खिल्लार जातीचे जातिवंत बैल घेऊन हजारो शेतकरी स्पर्धेसाठी आले होते. त्यामुळं स्पर्धेच्या ठिकाणाला जत्रेचंच स्वरूप प्राप्त झालं होतं. इथं बैलांच्या सजावटीची अनेक दुकानं थाटलेली होती. इथं काय नव्हतं? घागरमाळी, मोरक्या, विविध प्रकारचे आणि आकाराचे घुंगरू, चामड्याचे घुंगरूपट्टे, शिंगावर लावायच्या पितळी शेंब्या, अंगावरच्या झुली, शिंगांना लावायचे गोंडे, नवनवीन झुली असं सर्वकाही होतं. बैलांच्या साजशृंगाराचं हे साहित्य तयार करून विकणारे राक्षे कुटुंबीय इथं भेटले. बीड जिल्ह्यातील गोरख राक्षे हे घरातून बाहेर पडतात आणि जनावरांचे बाजार, यात्रांमध्ये या जित्रांबांच्या साजशृंगाराच्या गोष्टी विकतात. यासाठी ते तीन ते चार महिने घराबाहेरच काढतात. त्यांच्याशी चर्चा करून या आगळ्यावेगळ्या व्यवसायाची माहिती घेतलीय आमचे औरंगाबादचे ब्युरो चीफ विवेक राजूरकर यांनी...

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.