...आणि तमाशा बदलला आंबेडकरी जलशात

भीमराज की बेटी मैं तो जयभीम वाली हू…अशी लाखामध्ये देखणी माझ्या भीमरावाची लेखणी… अशा विविध प्रकारच्या गाण्यांमध्ये आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महती दिसून येते. बाबासाहेबांचा समतेचा लढा या गाण्यांतून लोकांसमोर दिसून येतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या कीर्तीचा महिमा सांगणारी ही गीतपरंपरा सुरू झाली ती १९३२ पासून. बाबासाहेबांना इंग्लंडमध्ये भरणाऱ्या दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी बोलावण्यात आलं. आणि इथं बाबासाहेबांच्या कार्याला मदतीचा हात मिळाला. शाहीर पत्रकाराची भूमिका करू लागले. तमाशातली आपली कामगिरी सोडून भाऊ फक्कड बाबासाहेबांची माहिती सांगणारे पोवाडे गाऊ लागले. त्याचंच रूपांतर आंबेडकरी जलसामध्ये झालं.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.