भीमगीतांच्या मार्केटमध्ये विचारांचा ठेवा!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर! भारतीय घटनेचे शिल्पकार! महामानव! दलित, वंचित समाजाला गुलामगिरीच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांनी प्राप्त करून दिला. त्यांना अभिप्रेत असणारा 'समतेचा नारा' हा अवघ्या भारतवर्षासाठी होता. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असं त्यांनी म्हटलं खरं, पण...पिढ्यान् पिढ्या अक्षर ओळख नसलेल्या समाजाच्या दारापर्यंत ही शिकवण नेणं हे एक आव्हानच होतं. अक्षर ओळख नसली तरी या समाजाकडं गाणं होतं. ते हेरूनच वामनदादा कर्डकांसारख्या समाजधुरीणांनी भीमगीतांची निर्मिती केली आणि बघता बघता त्यांच्या विचारांचा वणवा पेटला. त्यामुळं ही भीमगीतं म्हणजे आंबेडकरी विचारांचा ज्वलंत ठेवा आहे. त्यामुळंच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेला प्रत्येक जण हा ठेवा गाठीशी बांधूनच परतत असतो. त्यातूनच आज या भीमगीतांचं मोठं मार्केट झालंय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.