वारसा हस्तकलेचा...

ब्युरो रिपोर्ट

महाबळेश्वर – आपल्या भारतीय संस्कृतीत हस्तकलेला खूप महत्त्व आहे. ही हस्तकला जोपासण्याचे अनेक प्रयत्न केले जातात. त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी  वसलेलं ‘हस्तकला केंद्र’. चंद्रकांत उतेकर यांच्या या हस्तकला केंद्रात काश्मीरपासून  कन्याकुमारीपर्यंत, गुजरातपासून आसामपर्यंतच्या सर्वच प्रदेशातल्या विविध हस्तकलेच्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री होते.

 

Handicraft image  7हस्तकला केंद्रात विविध वस्तूंचा समावेश

या हस्तकला केंद्रात काश्मीरच्या वेतापासून बनवलेल्या टोकऱ्या, त्रिपुराच्या बांबूच्या टोकऱ्या, तसंच कोलकात्याच्या ज्युटच्या वस्तू, कन्याकुमारीचे शंख, सारंगपूरच्या लाकडाच्या वस्तू, वाराणसीचे रेशमापासून बनवलेले वॉलपीस, तसंच मुरादाबादमधील ब्रासच्या वस्तू आणि हैदराबादचे स्टॅच्यू, अशा भारताच्या वेगवेगळ्या राज्यांतील वैशिष्ट्य असलेल्या वस्तू बघायला मिळतात.

 


Handicraft image  12हस्तकला बोटातील जादू

हस्तकला म्हणजे साधी हत्यारे, उपकरणे वापरून हाती तयार करण्यात आलेल्या कलात्मक वस्तू. हस्तकला ही पारंपरिक कला आहे. हस्तकला ही लोकांच्या बोटातील कलात्मक जादू आहे आणि या जादूतूनच वीणकाम, भरतकाम, सुईकाम, जरीकाम, शिवणकाम, कोरीव काम, नक्षीकाम, सुतारकाम, कुंभारकाम, बाहुल्या बनवणं, रांगोळ्या, चित्रकला, असे हस्तकलेचे विविध प्रकार कलाकारांच्या बोटांमधून जन्म घेतात. या विलोभनीय वस्तू पाहूनच डोळ्यांचं पारणं फिटतं. या कलाकारांनी निर्मिती केलेल्या हस्तकला पाहूनच जिथे आपल्याला आनंद होतो, तिथं या कला घडवणाऱ्याला अधिक समाधान लाभत असेल, याचा विचारच केलेला बरा.

Handicraft image  1Handicraft image  2Handicraft image  11

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.