शेतकऱ्यांनी साधला पर्यटनाचा स्वीटकॉर्न !शेतकरी आणि मार्केटिंग हे चित्र दिसणं तसं दुर्मिळच, पण आता शेतकरी हळूहळू मार्केटिंगकडं वळू लागलाय. आता उन्हाळा सुरू झालाय त्यामुळं शाळा, कॉलेजना सुट्ट्या लागल्या आहेत आणि कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांनी फलून गेले आहेत. हीच संधी कॅश करत कोकणातले शेतकरी पुढं सरसावलेत. रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी इथल्या अशाच काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन समूह शेतीत कलिंगड आणि स्वीटकॉर्नची (अमेरिकन मका) लागवड केलीय. त्याचं उत्पादन नियोजनाप्रमाणं आता ऐन पर्यटनाच्या मोसमात सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना एरवीपेक्षा चांगला नफा मिळतोय. Tags |
||
Comments
|