गुंठ्यात पिकली एक टन मिरचीकोकण आता पूर्वीसारखा राहिला नाय...पुण्या, मुंबईतून येणाऱ्या मनीऑर्डरकडं डोळे लावून आता इथली माणसं बसत नाही. मातीत राबतात. नवनवीन प्रयोग करतात. माड, काजू, आंबा बागा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती चांगला पैसा खुळखुळतो. बागायती नसली तरी मालामाल करणारी इथली माती आहे, याची पक्की खात्री आता शेतकऱ्यांना झालीय. चिपळूणच्या ज्याती रावराणे यांनी आपल्या 10 गुंठे शेतीत मिरचीची लागवड केली. अभिनव पद्धत अवलंबल्यानं त्यांना चक्क गुंठ्यात एक टन याप्रमाणं दहा टन उत्पन्न मिळालयं. हा आकडा ऐकून भल्याभल्यांना ठसका लागलाय. त्यातूनच बरेचजण आता त्यांची शेती पाहण्यासाठी येतात. Tags |
||
Comments
|