रेन हावेस्टिंगच्या संकल्पाची ५१ फुटी गुढीविवेक राजूरकर नववर्षाचं औचित्य साधत लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद डायमंड आणि कुलस्वामिनी मंगल कार्यालय याच्यातर्फे ५१ फुटी गुढीचं आयोजन करण्यात आलं होतं. सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश देत सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याचं योग्य नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे, हा संदेश पोचवण्याच्या उद्देश यामागं होता. पाण्याचा वापर जपून करा, यासाठी शहरवासीयांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग, अर्थात, पावसाचं पाणी साठवण्यासाठी योग्य नियोजन करणं आवश्यक आहे ही संकल्पना राबवण्याचा हेतू ही ५१ फुटी गुढी उभारण्यामागं होता, असं आयोजकांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं. Tags |
||
Comments
|