तेल्याभुत्यासाठी म्हाद्या धावला!

अभिषेकासाठी तेल्याभुत्यासह राज्यभरातून आलेल्या 150 कावडींसाठी म्हादया धावला आणि अवघड मुंगी घाट पार करून या कावडी डोंगरावर गेल्या. हजारो भाविकांच्या उपस्थितीत 'हर हर महादेव'च्या गजरात शंभू महादेवाला अभिषेक घालण्यात आला. सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची यात्रा यंदाही अशी मोठ्या उत्साहात पार पडली. परंतु, दुष्काळामुळं ऐनवेळी पंचाईत नको म्हणून कावडीधारकांनी येताना गावाकडूनच पाण्याच्या टाक्या आणल्या होत्या.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.