रांगड्या तांबड्या मातीतला पठ्ठ्या!

मऱ्हाटी मुलखातील तांबड्या मातीत कुस्ती बहरली. भारताला ऑलिंपिकमध्ये पहिलं पदक मिळालं ते कुस्तीत, आणि ते मिळवून दिलं कृष्णाकाठच्या खाशाबा जाधव यांनी. काळ बदलला... तालमी ओस पडू लागल्या, राजाश्रय गेला, कुस्तीला उतरती कळा लागली. तरी आजही काही ठिकाणी असे काही शड्डू घुमतात, की मराठी मातीचा आवाज सातासमुद्रापार जातो. मुंबईमधील कांदिवलीतील साई क्रीडा संकुल त्यापैकीच एक. इथला ऑलिंपिकपटू नरसिंग यादवनं राज्याचं आणि देशाचंही नाव कुस्तीत उज्ज्वल केलंय. हा पठ्ठ्या कुस्तीत भारताचं नाव आणखी उज्ज्वल करील, असा आशावाद सर्वांनाच वाटतोय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.