मानसीचा चित्रकार तो...! भाग १

कुठल्याही राष्ट्राचा इतिहास कलेतूनच अधिक स्पष्टपणं जाणून घेता येतो. महाराष्ट्राला चित्रकलेचा सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. या विस्तीर्ण कालखंडात वेळोवेळी झालेल्या स्थित्यंतरांमुळं त्यात बदल होत गेले. या सर्व कालखंडात मऱ्हाटी मातीतील चित्रकारांनी आपापल्या परीनं चित्रकलेला वेगळं परिमाण देऊन ती समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. अलिकडचे एम. एफ. हुसेन यांच्यापासून ते वासुदेव कामतांसारखे ख्यातकीर्त चित्रकार याच कडीतील. सरकारपासून समाजापर्यंत सर्वच जण चित्रकलेबाबत उदासीन असतानाही वासुदेव कामतांसारखे कलाकार जे प्रयत्न करतायत त्यातून भविष्यात मऱ्हाटी मातीतील चित्रकलेचा कॅनव्हास जगाच्या पाठीवर बहरेल, अशी आशा करायला जागा आहे.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.