हापूसला साज 'सिंधू'चा!- डॉ. मुराड बुरोंडकरकोकणात सध्या हापूसचा सीझन आहे. ''आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो,'' असं कोकणचं वर्णन केलं जातं. कोकणी माणसाला राजा बनवणाऱ्या आंब्याच्या विविध जाती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं विकसित केल्यात. पण या आंब्यामध्ये सिंधू ही जात जरा हटके आहे. कारण ती आहे बिनबाट्याची म्हणजेच कोईविरहित आणि त्याचा शोध लावलाय कोकणातल्या लाल मातीत जन्मलेल्या डॉ. मुराड बुरोंडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून इचलकरंजीच्या ‘फाय फाऊंडेशन’चा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळालाय. Tags |
||
Comments
|