मऱ्हाटी मातीचं दुर्मिळ लेणं चरित्र खंडातूनआधुनिक भारतीय दृष्यकलेच्या इतिहासात महाराष्ट्राच्या चित्र-शिल्प परंपरेचं योगदान अभूतपूर्व आहे. त्याची माहिती नवीन पिढीला व्हावी, या उद्देशानं 'शिल्पकार चरित्रकोश' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकाराला येतोय. या प्रकल्पातील सहाव्या दृश्यकला खंडाचं प्रकाशन नुकतचं मुंबईत झालं. या कोशात महाराष्ट्रातील तीनशेहून अधिक चित्रकार, शिल्पकार, उपयोजित कलाकार तसंच व्यंगचित्रकारांचा समावेश आहे. एवढंच नव्हे तर चरित्रासोबतच त्यांच्या अभूतपूर्व कलाकृतींचाही समावेश करण्यात आलाय. या कलाकृतींसाठी 72 पानांचा चित्रविभाग या खंडात देण्यात आलाय. त्यात यापूर्वी कधीच प्रकाशित न झालेली अशी दुर्मिळ चित्र आहेत. त्यामुळंच हा खंड म्हणजे महाराष्ट्राच्या कलेचा दस्ताऐवजच आहे. Tags |
||
Comments
|