कोकण बनतंय फाईव्ह स्टार भाज्यांचं आगार

आपल्या देशातील हॉटेल संस्कृतीत आता अनेक परदेशी भाज्यांनी स्थान मिळवलंय. इथल्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये बहुतांशी पदार्थांमध्ये ब्रोकोली, सॅलड, लेट्यूस, बॉम्बी, ऑरबिल, पिकॅडो इत्यादी एक्झॉटिक भाज्या वापरात येतायेत.  या विदेशी भाज्या परदेशातून आयात कराव्या लागतात. मात्र या भाज्या आपल्याकडंच पिकू लागल्या तर... कोकणातल्या लाल सुपिक मातीत या विदेशी भाज्यांचं चांगलं उत्पादन घेता येवू शकतं, हे दाखवून दिलंय रत्नागिरी जिल्ह्यातल्या येळणे गावच्या महेश केळकर या प्रयोगशील शेतकऱ्यानं. त्यांनी आपल्या शेतात रंगबिरंगी शिमला मिर्ची आणि लाल कोबी सारख्या विदेशी भाज्यांची लागवड करून उत्तम नफा मिळवलाय.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.