सुंदरा मनामध्ये भरली...

मुश्ताक खान

रत्नागिरी - ग्रामीण भागातल्या तरुणींनाही मॉडेलिंग आणि चित्रपट क्षेत्रात संधी मिळावी, यासाठी रत्नागिरीच्या किनारा गृपनं 'महाराष्ट्र सुंदरी स्पर्धा २०१३'चं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, मुंबई, सांगली, सातारा, रत्नागिरी, औरंगाबाद या भागांतून आलेल्या जवळपास १०० तरुणींनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या तीन राऊंडनंतर निवडण्यात आलेल्या ९ तरुणींमधून तीन विजेत्या स्पर्धक निवडण्यात आल्या. यात कोल्हापूरच्या रागिणी कुबेरनं बाजी मारत 'महाराष्ट्र सुंदरी २०१३' हा किताब पटकावला. पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार आणि ७ हजार रोख रक्कम आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील मांजरेकर यांनी विजेतीला आपल्या आगामी सिनेमामध्ये सेकंड लीड रोल देणार असल्याचं कबूल केलंय. एकूणच या स्पर्धेमुळं ग्रामीण भागातही स्त्रीसौंदर्याविषयी विशेष जाणीव निर्माण करण्य़ाचं काम या स्पर्धेनं केलंय. याशिवाय या स्पर्धेमुळं अनेक तरुणींना आपलं नशीब अजमावण्याची संधीही मिळाली.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.