यंदा नागरिकांनी चाखले 300 कोटींचे आंबे!

आंबा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. त्यामुळंच की काय दरवर्षी पेक्षा यंदा आंबा चांगलाच भाव खाऊन गेलाय. यावर्षीचा आंब्याचा हंगाम चांगला असून आतापर्यंत तब्बल 300 कोटींचे आंबे नागरिकांनी खाल्ले असल्याची माहिती एपीएमसीच्या फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना दिलीय. कोकणातेच नव्हे तर गुजरात आणि कर्नाटकचेही आंबे जगाच्यानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम वाशीतलं एपीएमसी मार्केट करतं. एप्रिल महिना सुरू झाला की, या फळ मार्केटमध्ये आंब्यांच्या राशी दिसायला लागतात. दरवर्षी इथं होणारी आंब्यांची उलाढाल कोट्यवधी रुपयांच्या घरात असते. यंदाच्या आंबा बाजारावर एलबीटी आंदोलनाचं सावट होतं, त्यामुळं मार्केट बंदही होतं. व्यापाऱ्यांना आंदोलनामुळं आंबा अनेक दिवस साठवून ठेवावा लागला असला तरी मुंबईकरांनी मात्र तो चोपून खाल्लाय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.