अंधारातून प्रकाशाकडे...राधा खोपकर वसई – वसई इथं राहणाऱ्या मोहन कर्णिक यांना आजारपणामुळं अचानक अंधत्व आलं. पण ते हतबल झाले नाहीत. त्यांच्यात असलेल्या सुप्त कवीला जागवण्याचं आणि त्यांच्या प्रतिभेला वाव देण्याचं महत्त्वाचं कार्य त्यांची अर्धांगिनी शुभांगी कर्णिक यांनी केलं. ...आणि मोहन कर्णिक यांना स्फुरलेली प्रत्येक कविता पत्नी शुभांगी यांनी वहीत उतरवली. मोहन यांना स्फुरलेल्या कवितांच्या आज जवळपास 51 वह्या झाल्या आहेत. 'दृष्टी' आणि 'पुनश्च दृष्टी' हे त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झालेत. 25 वर्षांपूर्वी आलेल्या अंधत्वामुळं खचून न जाता वयाची 78 वर्षं उलटलेले मोहन कर्णिक अंधांसाठी मार्गदर्शक ठरलेत. चला तर आपण जाणून घेऊया... मोहन कर्णिक यांच्या आयुष्याविषयी आणि त्यांच्या कवितांविषयी... Tags |
||
Comments
|