नेरळची सगुणाबाग

सुमित बागुल

रायगड जिल्ह्यातल्या नेरळजवळ 16 हेक्टर जमिनीवरील सगुणाबाग शेती पर्यटनासाठी आकर्षणाचं ठिकाण झालंय. स्वातंत्र्यसैनिक हरिकाका भडसावळे यांनी 1960 मध्ये हा उपक्रम सुरु केला. त्यांचा मुलगा चंद्रशेखर यानं तो जागतिक पातळीवर नेऊन पोहोचवलाय.

 

आता सगुणाबाग हे फक्त शेती पर्यटन स्थळ न राहता शेतीसाठीचं एक संशोधन केंद्रही बनलंय. खास करुन भातशेतीसाठीचं वेगवेगळ्या पातळ्यांवरचं संशोधन सगुणाबागेत करण्यात येतंय. त्याला एसआरटी तंत्रज्ञान म्हणतात. एसआरटी म्हणजे सगुणा राईस टेकनिक्स. या तंत्रज्ञानात भात लागवडीपासुन ते काढणीपर्यंत अगदी सोप्या पीकपद्धती शोधुन काढण्यात आल्यात. उदा. भातलागवडीसाठी गादी वाफ्याचा वापर करणे. कुढल्या किटकांचा प्रादुर्भाव होतोय हे जाणुन घेण्यासाठी प्रकाश सापळा बसवणे. अशा सोप्या आणि शेतकऱ्यांना सहज करता येतील अशा पद्धतींचा शोध इथं लावण्यात आलाय.

 

भातपेरणीनंतर त्याला सगळ्यात जास्त भिती असते ती खेकड्यांची. पीक लहान असतानाच खेकडे ते खाऊन टाकतात आणि शेतकऱ्यांची मेहनत वाया जाते. आणि खेकडे पकडणं शेतकऱ्यांना शक्य होत नाही. म्हणुनच या खेकड्यांना मारण्यासाठी एक युक्ती केली जाते. साधारणपणे शेतकरी खेकड्यांच्या बीळांमधुन ते बाहेर येऊ नयेत म्हणुन त्यात गवत टाकुन ठेवतात, पण त्या गवताला न जुमानता खेकडे बाहेर येतात आणि भाताची नासधुस करतात. म्हणुनच त्या बिळांमध्ये गिरीपुष्प या झाडाची पानं टाकण्यात येतात या पानांमुळं खेकडे त्यांच्या बिळांच्या बाहेर न येता बिळातच मरतात आणि भाताची शेती वाचते.

 

अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या फायद्याच्या छोट्या छोट्या गोष्टी चंद्रशेखर भडसावळे आणि त्यांची टीम सतत शोधत असते.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.