धबधबे खुणावतायेत तरुणाईला

मुश्ताक खान

कोकणात सध्या पावसाळा ऐन भरात आहे. पाऊस म्हटल्यावर कोकणाचं सौदर्य आणखीच खुलतं. त्यातच कोकणातल्या तरुणाईला सध्या फेसाळणारे धबधबे खुणावतायत. रत्नागिरी जवळच्या अशाच पानवल जवळच्या धबधब्याचा अनोखा नजराणा पर्यटकांची गर्दी खेचत आहे. महत्त्वाचं म्हणजे हा धुबधब इतर धबधब्यांच्या तुलनेत सुरक्षितही आहे. रत्नागिरीमध्ये पावसाळा सुरु झाला की अनेक धबधबे जीवंत होता. काही धबधबे सगळ्यांना परिचीत आहेत तर काहींची  ओळख अजूनही व्हायची आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातले अनेक धबधबे अंगावर अक्षरश: शहारे आणतात. त्यात मग चिपळूणचा सवत सडा, रत्नागिरीचा निवळी धबधबा, सिंधुदुर्गातला आंबोली इथला धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षीत करतात. पण पानवळ इथला धबधबा स्थानिक पर्यटकांना जरी महित असला तरी तो बाहेरुन येणाऱ्या फारच कमीच पर्यटकांना माहित आहे. फेसाळत कड्यावरुन कोसळणाऱ्या पानवलच्या धबधब्यात चिंब भिजावं असंच प्रत्येकाला वाटत असतं.


उंचावरुन पडणाऱ्या या धबधब्यात वेळ कसा निघून जातो हेच कळत नाही. इथं येवून अनेक तरुण तरुणी या धबधब्याखाली तासंतास बसून राहतात. भिजतात, या कोसळणाऱ्या प्रवाहाच्या खाली उभे राहतात. गाणी म्हणतात आणि इथं आल्यानंतर सर्व टेनशन विसरल्याचा भास अनेकांना होतोच होतो. कोकणातले हे धबधबे अनेकांना स्वर्गसुखा एवढे वाटत आहेत. कोकणातल्या प्रत्येक धबधब्यावर तरुणाई आवर्जून गर्दी करतेय. पण पर्यटकांना अपरिचीत असणाऱ्या धबधब्यांसाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे असं ही तरुणाईचं मत आहे. सिंधुदुर्गच्या तुलनेत पर्यटनाच्या दृष्टीनं रत्नागिरी जिल्हा तसा मागासच आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यटन वाढावं यासाठी प्रशासन हवं तेवढं पुढाकार घेत नाहीये. अनेक पर्यटन क्षेत्राकडे जाण्यासाठी सुचना फलकही लावण्यात आलेले नाहीत. त्याचबरोबर इथले रस्ते तर अत्यंत खराब.


रत्नागिरीतल्या प्रशासनाने जर पर्यटन चालनेकडे गांभिर्याने लक्ष दिलं तर स्थानिकांनाही आपला आर्थिक विकास साधता येणार आहे. यासाठी नाव्याने पालकमंत्री झालेले उदय सामंत यांनी दखल घेण्याची गरजही अनेकांनी बोलुन दाखवली.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.