गोविंदांचा सुरु झालाय काला...!

मुंबईसह राज्यभरात दहीहंडीची धूम मोठ्या उत्साहात सुरू आहे. 'गोविंदा आला रे आला' आणि 'गोविंदा रे गोपाळा' च्या तालात तरुणाईची पावलं थिरकत आहेत. गावागावात आणि सोसायट्यांमध्ये दहीहंडी फुटल्या. आता लाखमोलाच्या दहिहंडी फोडण्यासाठी गोविदा पथकं लावणारे उंचच उंच मानवी मनोरे पाहण्यासाठी अबालवृद्धांनी मोठी गर्दी केलीय. अलिकडच्या काळात ठाणे हे दहीहंडी उत्सवाचं हॉट डेस्टिनेशन झालंय. त्यामुळं दहीहंडी पाहण्यासाठी तिथं सर्वाधिक गर्दी झालीय. आता सर्वांना उत्सुकता आहे ती कुठली दहीहंडी कोण घेऊन टाकणार याची....!!!

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.