बाप्पांनाही झळ महागाईची!गणेशोत्सव आता उंबरठ्य़ावर आला असून बाप्पांच्या मूर्ती आणि सजावटीच्या साहित्याच्या स्टॉल्सनी राज्यभरातील बाजारपेठा फुलून गेल्यात. महागाईची झळ बाप्पांनाही बसली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत मूर्तींच्या किंमती सुमारे 30 टक्क्यांनी वाढल्यात. त्यामुळं महागाईमोलाचा बाप्पा घरी नेताना भाविकांच्या खिशाला चाट बसणार आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस, माती, रंग, मजुरी असे सर्वांचेच भाव वाढल्यानं भाववाढ अटळ होती, असं मूर्तीकार सांगतायत. त्यामुळं एकुणच गणेशोत्सवावर महागाईचं सावट असेल, हे आता स्पष्ट झालंय. Tags |
||
Comments
|