पेणच्या सुबक मूर्तींनी सजल्या बाजारपेठा!गणपती आता तोंडावर आलेत. विविध प्रकारच्या आणि आकाराच्या बाप्पांच्या मूर्तींनी बाजारपेठा भरुन गेल्यात. 'पेणच्या सुबक मूर्ती' असे फलक सर्वत्रच पहायला मिळतायत. कसबी कारागीर आणि नैसर्गिक वाटावे, असे रंगकाम या साऱ्यांमुळे पेणच्या मूर्ती आज महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचे प्रतीक झाल्यात. पेणमधून यावेळी 30 लाखांच्यावर मूर्ती तयार झाल्या असून विक्रीसाठी त्या राज्यात तसंच विदेशातही रवाना झाल्यात. यातून यंदाची उलाढाल 40 ते 45 कोटींच्या घरात जाईल, असा अंदाज आहे. Tags |
||
Comments
|