सामुहिक अथर्वशीर्ष पठण

ब्युरो रिपोर्ट

गणपतीबाप्पा म्हणजे सगळ्यांचचं आराध्य दैवत. बाप्पा आले की वातावरण कसं एकदम प्रसन्न झालेलं असतं. दहा दिवस प्रत्येकजण बाप्पांची आपआपल्यापरीनं सेवा करण्यात मग्न झालेला असतो. बोरीवलीमधील स्वहिता महिला परिवारानं सौ. प्रिती दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खास महिलांसाठी सामुहिक अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. बोरीवलीच्या स्वयंभू श्रीगणेश मंदिरामध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचं यंदाचं हे चौथं वर्ष. यावेळीही शेकडो महिलांनी यात भाग घेऊन २१ वेळा अथर्वशीर्षाचं आवर्तन, फलश्रुती आणि गणपती  बाप्पाची आरती केली.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.