कांद्याचे भाव आठवडाभरात आवाक्यात

कांद्यानं भाव खाल्ल्यानं इंडियात आरडाओरड सुरु झालीय. कोण काय तर कोण काय म्हणतंय. नाकानं कांदं सोलण्याचा इंडियातला हा प्रकार भारतीय समाज मोठ्या मजेनं बघतोय. साठेखोरी नाही, नफेखोरी नाही, व्यापाऱ्यांचा, शेतकऱ्यांचा हात नाही. अर्थशास्त्राच्या नियमानुसार मागणी आणि पुरवठ्याचं तंत्र बिघडल्यानं भाव वाढलेत. मध्यंतरी अवकाळी पाऊस झाल्यानं खरीपाचा कांदा अजून बाजारात आलेला नाही. दिवाळीनंतर तो आला की येतील भाव आटोक्यात. तोपर्यंत ही भाववाढ शेतकऱ्यांना बोनस समजायला काय हरकत आहे? कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी होऊन जाऊ दे...असाच सूर शेतकरी, व्यापारी वर्गातून पाहायला मिळतोय.   

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.